Posts

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

Image
आपल्या पाल्याची संगत कुणाबरोबर आहे या गोष्टीकडे पालकांनी लक्ष द्यावे तसेच पालक व पाल्य यांच्यामध्ये संवाद असल्यास मुलं व्यसनाच्या आहारी जात नाहीत असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले  त्यांची समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्ह्यासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार गयाबाई  बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, करमाळा यांच्यावतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते  यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे, राष्ट्रीय समाज पार्टी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते ,भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते उन्मेष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले की आजची युवा पिढी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून तंबाखू ,गुटखा, मावा धूम्रपान दारू याबरोबर ड्रग्स च्या विळख्यात सापडली आहे त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी पालकांचा सुसंवाद त्यांचे संस्कार या गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे व्

भविष्यात आरोग्यदायी सवयी आणी व्यायामासाठी आवर्जून वेळ कढावाच लागेल - महेश वैद्य

Image
 महेश वैद्य अपार जिद्दीने सर्वांसाठी एक आरोग्य ट्रेनर म्हणुन काळजी घेत आहेत.  महेश वैद्य यांनी हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ बद्दल अमिताव पाणिग्रही आणि इतर यांच्याशी चर्चा केली‌ आहे. या सर्वांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे  अमिताव पानिग्रही हे उच्य पदास्थ आहेत. ते कोटक महिंद्रा coroprate बँक चे इंडिया हेड आहेत असे महेश वैद्य याांनी सांगीतले. महेश वैद्य हे त्यांचे पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.  मुंबई चे संबधित सर्वच बिझनेसमन लोकांनी या आरोग्य विषयी सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. चांगल्या कामाला सहकार्याची जोड असेल तर खूप मन लावून काम करू असे मनोगत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.  रवि चौधरी हे शाश्वत फायनांसिएल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे मालक यांनी मार्गदर्शन करत आहेत. अशा प्रकारचा फिटनेस शिबिराचे आयोजन ठिक ठिकाणी व्हावे अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. लोकांमध्ये फिटनेस बद्दल जागृती निर्माण व्हावी. त्यासाठी महेश वैद्य हे गेली 26 वर्षा पासून कार्यरत आहेत.  त्यासाठी समाजसेवक तथा प्राथमिक शिक्षक किसन कांबळे सर, बाळासाहेब होसिंग, जेष्ठ उद्योजक संतोष  काका कुलकर्णी. गुरुवर्य

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Image
 जेऊर येथे जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान यांच्यावतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.  महिलांच्या कला गुणांना व बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान ने आयोजित केलेला उपक्रम अतिषय स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी सांगितले.  आदरणीय करे-पाटील जिजाऊ ब्रिगेड व लोकस्वराज प्रतिष्ठान   जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या वक्तृत्व, वेशभूषा व होममीनिस्टर स्पर्धामध्ये सामान्य महिलांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देणाऱ्या आहेत. यावेळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना विविध बक्षिसांचे वितरण गणेश करे पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सोलापुर सुरजा बोबडे जलसंपदा विभागाच्या अधिकारी माधुरी पवार या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले  होमिनिस्टर स्पर्धेत पहिले बक्षीस सुवर्णा मोहिते, दुसरे बक्षीस आरती घाडगे, तिसरे बक्षीस प्रियंका देवकते, उत्तेजनार्थ स्वाती सुरवसे यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धा पहिले बक्षीस

प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Image
प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.*  खडके ( एरंडोल ) : कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला मुलींचे बालगृहात आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि कल्पना हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमातून संस्था अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसाठी आणि मुलींसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले यावेळी बालगृहातील सर्व दाखल मुला मुलींचे डोळे तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आला तसेच संस्थेतील बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या प्रथमोपचारा साठी गोळ्या औषधींचे किट देखील देण्यात आले याप्रसंगी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ;श्री राहुल पाटील ;श्री बाळा राजपूत तसेच कल्पना हॉस्पिटलचे नंदू पाटील; गौरव पाटील उपस्थित होते.

पुणे विभाग स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत कोंढार चिंचोली येथील प्रदीप भुई याने १७ वर्षे वयोगटात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले

Image
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे विभाग स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत कोंढार चिंचोली येथील प्रदीप भुई याने १७ वर्षे वयोगटात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले …. कोंढार चिंचोली गावचा सुपुत्र आणि सध्या त्रिमूर्ती विद्यालय टाकळी या ठिकाणी अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रदीप भुई याने पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या पुणे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ८०० मीटर आणि १५०० मीटर धावण्यामध्ये धडाकेबाज कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवले. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रदीपची निवड झाली आहे. विशेष म्हणजे पुणे विभागामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर, अहमदनगर ग्रामीण , सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या प्रत्येक ठिकाणी क्रमांक पटकावलेल्या पहिल्या दोन खेळाडूंमधून अव्वल ठरत प्रदीपने सर्वांनाच आपली गुणवत्ता दाखवून दिली… प्रदीप भुई हा जिल्हा परिषद प्रा

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा "कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा" मोहोळ येथे संपन्न

Image
रविवार दि. 22/1/2023 रोजी *महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा सोलापूर* तर्फे *"कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा"* आयोजित करण्यात आला होता. महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय *शामराव जवंजाळ सर* यांनी भूषवले. हा मेळावा जिल्हाध्यक्ष *कमलाकर बनसोडे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच जिल्हा सरचिटणीस *किरण सगेल*, पुणे विभागीय अध्यक्ष तथा जोशाबा पतसंस्थेचे चेअरमन *बाळासाहेब कारंडे,* जोशाबा पतसंस्थेचे संचालक *महेश्वर कांबळे*, पुणे जिल्हाध्यक्ष *वसंत गोसावी*, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष *सुदर्शन वराडे,* सोलापूर मनपा विभाग शहराध्यक्ष *नागेश गोसावी*, मनपा शिक्षक सोसायटी चेअरमन *इमरान सौराज*, जोशाबा पतसंस्थेचे संचालक *सखाराम राऊत*, कोअर कमिटी सदस्य *सिकंदर शेख,* माध्यमिक जिल्हा सचिव *जयकर ठोंबरे*, मनपा सचिव *अमोल भोसले*, *इमरान जमादार* कार्याध्यक्ष मनपा,  जिल्हा सल्लागार *रजाक शेख*, जिल्हा मार्गदर्शक *अर्जुन हिरशेट्टी* यांच्या प्रमुख उपस्थितीत
Image
 जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा जि.प.प्रा.केंद्र शाळा मोडनिंब येथे सोमवार दि. 17 / 1 /2023 रोजी पार पडल्या करमाळा तालुका येथे प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिचा मोठ्या गटात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम झाला आहे . तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली होती.मोठ्या गटात पूर्ण जिल्ह्यातून एकूण 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटातून करमाळा तालुक्यातील पोथरे शाळेची इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त समृद्धीचा माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.बंडू शिंदे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं.निशिगंधा माळी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या मार्गदर्शक शिक्षिका सौं.शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. समृद्धीच्या या उत्तुंग यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी श्री.जयवंत नलवडे साहेब ,

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक च्या शाखेचे करमाळ्यात उदघाटन

Image
  करमाळा प्रतिनिधी हिंदू संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून समाजाला दिशा देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले असून देव देश धर्म संस्कृतीची जतन करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे योगदान नक्कीच प्रेरणादायी असून या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या कार्यालयाचे उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुका अध्यक्ष उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य निश्चित आदर्शवत असुन सर्व जातीय लोकांशी असलेले प्रेम जिव्हाळा चे संबंध याचा ऊपयोग ब्राम्हण समाजाच्या विकासासाठी नक्कीच कामाला येणार आहे करमाळा तालुक्यात ब्राह्मण समाजाचे कार्य नक्कीच महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणार आहे.या कार्यक्रमास कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी (राजुरी) उपाध्यक्ष श्री रवींद्र विद्वत (वरकुटे) सचिव.बाळासाहेब होसींग. कार्यवाह श्री.निलेश गंधे.(देवाचा माळ) श्री. शंकर कुलकर्णी (कार्याध्यक्ष) करमाळा श्री.साग

मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा स्त्रियांनाही हळदी कुंकुवाचा मान .

Image
  नर पूजा - हिच नारायण पूजा या संत वचनानुसार संत निरंकारी सत्संगच्या माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला . समाजातील अनिष्ठ रुढी परंपरे नुसार विधवा स्त्रियांना या सणातून वगळले जाते . परंतु संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक दृष्टीने ' नर हो चाहे नारी हो . कुदरत की रचना सारी हो । सर्व नारींचा यथायोग्य सन्मान व्हावा म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी वंचित राहत असलेल्या विधवांचाही हळदी कुंकूवाचे वाण देवून तसेच अंधारातून प्रकाशाकडे हे पुस्तक वाण म्हणून भेट देण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ ब्रँच करमाळाच्या वतीने - सौ प्रफुल्लता सातपुते- थोरात, सौ . संगीता नाईक सौ विजया थोरात यांनी केले .

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी

Image
आज तालुकास्तरीय लोकनृत्य, कथाकथन, वक्तृत्व व निबंध या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला करमाळा आणि न.पा. प्रा . शाळा क्र . 3 येथे पं. स . करमाळा यांच्या वतीने घेण्यात आल्या . या स्पर्धेत लोकनृत्य स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी १७ संघ तर वक्तृत्व, कथाकथन, निबंध या स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी प्रत्येकी ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला . यामधे पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्यात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला व पोथरे शाळेचे नाव तालुक्यात गाजवले. यामध्ये प्रामुख्याने पुढील यश मिळवले आहे. कथाकथन स्पर्धा – तालुक्यात प्रथम क्रमांक – समृद्धी राजेंद्र झिंजाडे निबंध स्पर्धा तालुक्यात व्दितीय क्रमांक – शिवानी राजेंद्र झिंजाडे वक्तृत्व स्पर्धा तालुक्यात तृतीय क्रमांक – शिवानी राजेंद्र झिंजाडे लोकनृत्य स्पर्धा तालुक्यात तृतीय क्रमांक सहभागी विद्यार्थी – १. ऐश्वर्या बापू जाधव २. अनुजा तात्यासाहेब शिंदे ३. लखन मारुती लाढाणे ४. किरण कृष्णा जाधव ५. गौरव प्रकाश शिंदे ६. समृद्धी राजेंद्र झिंजाडे ७. शिवानी राजेंद्र झिंजाडे कु.समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी

मागासवर्गीय शिक्षक संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करणार - संदिप कोहीनकर नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Image
  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक   संघटनेकडून नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधीकारी   मा .संदीप कोहिनकर  यांचा   राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ   व   जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे   यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ पुढे बोलताना म्हणाले की सर्व मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्याचं काम मागासवर्गीय शिक्षक संघटना करीत आहे याचा लाभ अनेक शिक्षकांनी आतापर्यंत घेतला आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास आपण सदैव दक्ष आहोत याबद्दल कोणीही मनात शंका ठेऊ नये असेही ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी संघटनेचे प्रश्न सोडीविण्यास सहकार्य करू असे कोहीनकर यांनी चर्चेतून शब्द दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले . यावेळी सोलापूर जिल्हा सचिव  किरण सगेल , दक्षिण तालुका अध्यक्ष  अंबादास खराडे , उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष  गुंडिबा हरगुडे , कोअर कमिटी  सिकंदर शेख  ,मनपा  मुनाळे सर, इम्रान सर,   प्रभाकर   मठ ,  खाजाप्पा बनसोडे , जिल्हा सल्लागार  रजाक   शेख ,  हिरशेट्टी सर  उपस्थित होते.
Image
 डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न करमाळा : महापुरुषांचे शैक्षणिक कार्य हे खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले. तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मिलिंद फंड, बाळासाहेब गोरे, प्रताप काळे, सुरेश शिंदे, अतुल वारे, अमित घोगरे, सचिन काळे, नवनाथ ससाणे, अरुण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.                    यावेळी गणेश करे-पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच प्राजक्ता गोयकर, आदित्य
Image
    अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महेश वैद्य यांचा शारीरिक शिक्षणाच्या योगदानाबद्दल जाहीर सत्कार December 29, 2022   अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन. करमाळा:अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या (नाशिक)२०२१ -२०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन या निमित्ताने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कालावधीत पाच दिवसांच्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंस स्वामी, शंकराचार्य सच्चिदानंद स्वामी, अभिनेते डॉ.गिरीश ओक.भाजपचे माजी खासदार, किरीट सोमय्या, सुप्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवा उपस्थित होते.नाशिकच्या अभ्यंकर सभागृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीष ओक आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ५० समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.करमाळा अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष रविंद्र विद्वत,सचिव बाळासाहेब

जेऊर चे जिनियस अबॅकस सेंटर पुण्यात ठरले यशाचे मानकरी...

Image
जेऊर येथील जिनियस अबॅकस सेंटर ची पुण्यात घवघवीत यश महाराष्ट्र  राज्यातील 7 जिल्ह्य़ातून पुणे येथे 29/12/2022 रोजी झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत 8750 विद्यार्थी मधुन कु.ईश्वरी सोमनाथ काशिद इयत्ता 3 री.ही लेवल 1च्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून विनर झाली.तसेच लिटिल चॅम्प लेवल मधे असरलान जावेद फकीर इयत्ता-2री हा 5 व्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे तसेच लेव्हल 1 च्या परीक्षेत अंजनडोह येथील श्रीराम केतन पाटील इयत्ता-4 थी चौथ्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे.8450 विद्यार्थी मधुन वरील 3 विद्यार्थ्यांची  पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षेत साठी निवड झाली आहे. ईश्वरी ,श्रीराम आरसलानचे खूप खूप अभिनंदन. तसेच 22 विद्यार्थी गोल्ड मेल्डलिस्ट मिळवुन यशस्वी झाले आहेत. लिटिल चॅम्प लेवल मधे दर्श रंदवे, उमेरा फकीर, सिद्धी गुळवे,गौरी शिंदे , तनिष्क सुर वसे, रणवीर पाटील, शाश्वत सुतार हे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले.लेवल 1 च्या परीक्षेत पार्थ वाघमोडे , शौर्यतेज रोकडे, सुयश चव्हाण, श्रुति गुंडगिरे , अनन्या मंजरतकर,शिवतेज मंजरतकर, यांना ही गोल्ड मेडल्स भेटले तसेच लेवल 2 च्या परीक्षेत ईशान फकीर, आरोही पाटी

राज्यस्तरीय खो~खो स्पर्धेत सोलापूर महिला संघाने पटकावला पाचवा क्रमांक

Image
  दि. ५ ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी हिंगोली येथे झालेल्या ५८ व्या राज्यस्तरीय पुरुष - महिला खो-खो  अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेमध्ये सोलापूर महिला खो-खो संघाने ५ वा क्रमांक मिळविल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा... महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे उपाध्यक्ष , सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष  शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मा.महेशजी गादेकर साहेब , अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव मा. चंद्रजीत जाधव साहेब , श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे सर्वेसर्वा मा. कल्याणरावजी काळे साहेब , सचिव मा. बाळासाहेब काळे गुरूजी , महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे सचिव मा. गोविंद शर्मा सर , मा. सचिव संदिपजी तावडे साहेब , पंचमंडळ अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मा. श्रीकांतजी ढेपे साहेब , सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे सचिव मा. सुनिल चव्हाण साहेब , खजिनदार मा. श्रीरंग बनसोडे सर , प्राचार्य दादासाहेब खरात सर , पर्यवेक्षक सत्यवान काळे सर यांनी अभिनंदन  केले व शुभेच्छा दिल्या. सोलापूर महिला संघाचे प्रशिक्षक संतोष पाटील सर , व्यवस्थापक कु.आरती काळे हे होते. किसन कांबळे 99703

मा. संजय सरवदे नॅशनल ग्रेट अचीवर्स अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित

Image
 *सामाजिक कार्याची दखल घेऊन करमाळा तालुक्यातील घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र यांचेकडून नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित* शेतकरी पुत्र फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा नगर येथे रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आपण ही गेल्या अनेक वर्षभरापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आपण केलेले कार्य हे आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे.आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 आपणास हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पद्यश्री मा. सौ राहीबाई पोपरे (बीजमाता) ,पद्मश्री पुरस्कार विजेते मा.पोपटराव पवार (आदर्श सरपंच) हिवरे बाजार, मा. श्री कैलास राऊत मा. श्री किशोर भणगे अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा यांच्या हस्ते शाल श्

करमाळा शहरातील टाऊन हाल ला उतरती कळा...

Image
 करमाळा शहरातील ऐतिहासिक टाऊन हॉल धूळ खात पडून ! करमाळाः प्रतिनिधी , 6 नोव्हेंबर 2022 : करमाळा शहरातील जयप्रकाश नारायण टाऊन हाँल हा एकेकाळी शहराचा मानबिंदू होता. याचे बांधकाम सुमारे 50 वर्षापूर्वी करमाळा नगर परिषदेने केले होते. यामध्ये लाखाच्या ही पुढे लग्न सोहळे , विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. कित्येकांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात येथून झाली आहे तर कित्येक लोकांच्या स्मृती या हाँल शी जुळलेल्या आहेत. याठिकाणी कित्येक राजकीय पक्षाचे जिल्हा प्रमुख  राज्य प्रमुख एवढेंच नव्हे तर केंद्रीय मंत्री सुद्धा येऊन गेले आहेत. असा हा जयप्रकाश नारायण टाऊन हाँल पडझडी मुळे धूळ खात दुर्लक्षीत आहे. त्याने जर स्वतः चे आत्मकथन केले तर करमाळा शहर वासियांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहिल्या शिवाय राहणार नाही. या टाऊन हॉल संदर्भातील करमाळाकरांच्या मनातले दुःख कधी कमी होईल याची खात्री कोण देईल काय ? किसन कांबळे 9970381507

विधायक काम कशातूनही करता येते..!

Image
 Human Life Is Precious... लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून भावी पिढीच्या शिक्षणासाठी शाळेला देणगी दिली. याला सामाजिक भान जपले असेच म्हणतात... अशा लोकांमुळे च समाज उत्तम प्रगती पथावर जाणार यात काही शंका नाही... किसन कांबळे 9970381507