जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी
आज तालुकास्तरीय लोकनृत्य, कथाकथन, वक्तृत्व व निबंध या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला करमाळा आणि न.पा. प्रा . शाळा क्र . 3 येथे पं. स . करमाळा यांच्या वतीने घेण्यात आल्या .
या स्पर्धेत लोकनृत्य स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी १७ संघ तर वक्तृत्व, कथाकथन, निबंध या स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी प्रत्येकी ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला . यामधे पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्यात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला व पोथरे शाळेचे नाव तालुक्यात गाजवले.
यामध्ये प्रामुख्याने पुढील यश मिळवले आहे.
कथाकथन स्पर्धा–
तालुक्यात प्रथम क्रमांक – समृद्धी राजेंद्र झिंजाडे
निबंध स्पर्धा
तालुक्यात व्दितीय क्रमांक –
शिवानी राजेंद्र झिंजाडे
वक्तृत्व स्पर्धा
तालुक्यात तृतीय क्रमांक –
शिवानी राजेंद्र झिंजाडे
लोकनृत्य स्पर्धा
तालुक्यात तृतीय क्रमांक
सहभागी विद्यार्थी –
१. ऐश्वर्या बापू जाधव
२. अनुजा तात्यासाहेब शिंदे
३. लखन मारुती लाढाणे
४. किरण कृष्णा जाधव
५. गौरव प्रकाश शिंदे
६. समृद्धी राजेंद्र झिंजाडे
७. शिवानी राजेंद्र झिंजाडे
कु.समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याप्रसंगी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी . राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी .जयवंत नलवडे साहेब तसेच पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख .निशांत खारगे साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बप्पासाहेब शिंदे व्यवस्थापन समिती चे सर्व सन्माननीय सदस्य आणि शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.गजेंद्र गुरव सर यांनी सर्व विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
किसन कांबळे सर
9970381507

Comments