अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महेश वैद्य यांचा शारीरिक शिक्षणाच्या योगदानाबद्दल जाहीर सत्कार
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन.
करमाळा:अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या (नाशिक)२०२१ -२०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन या निमित्ताने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कालावधीत पाच दिवसांच्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंस स्वामी, शंकराचार्य सच्चिदानंद स्वामी, अभिनेते डॉ.गिरीश ओक.भाजपचे माजी खासदार, किरीट सोमय्या, सुप्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवा उपस्थित होते.नाशिकच्या अभ्यंकर सभागृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीष ओक आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ५० समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.करमाळा अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष रविंद्र विद्वत,सचिव बाळासाहेब हौसिंग, कार्यवाह निलेश गंधे कार्यकारिणी सदस्य शुभम कुलकर्णी या महोत्सवात उपस्थित होते. २१ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवा यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी समाज बांधवांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवास करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंस स्वामी, शंकराचार्य सच्चिदानंद स्वामी यांचे पाद्यपुजन करण्यात आले. यावेळी महेश वैद्य यांचा फिटनेस (स्वास्थ्य) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान पुरस्कार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शंकराचार्य विद्यानृसिंस स्वामी यांच्या हस्ते अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या करमाळा शाखेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी,उपाध्यक्ष रविंद्र विद्वत,सचिव बाळासाहेब हौसिंग, कार्यवाह निलेश गंधे कार्यकारिणी सदस्य शुभम कुलकर्णी यांचा उत्कृष्ट सामाजिक कामाबद्दल सत्कार करण्यात आला.
किसन कांबळे सर
9970381507

Comments