डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
करमाळा : महापुरुषांचे शैक्षणिक कार्य हे खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले. तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मिलिंद फंड, बाळासाहेब गोरे, प्रताप काळे, सुरेश शिंदे, अतुल वारे, अमित घोगरे, सचिन काळे, नवनाथ ससाणे, अरुण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गणेश करे-पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच प्राजक्ता गोयकर, आदित्य हेळकर, प्रेरणा मोहोळकर, स्नेहल बिनवडे, उदयराज वाघमारे, सौरभ काळे, शुभम बरकडे, रोहन धोंडे, मोक्षदा वीर, उत्कर्ष कानडे (वैद्यकीय), अजित निमगिरे, वसुंधरा खरात, श्रीकृष्ण येवले (पी.एस.आय.), महेश देशमुख, सोनाली शेटे, भाग्यश्री बनकर, चेतन नलावडे (एस.टी.आय.), वैष्णवी पाटील (धनुर्विद्या), स्वामीनी पोतदार (योगासने), मानव हेळकर (एनडीए) आदींचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी या नावाने सन्मान करण्यात आला.
संतोष शितोळे यांनी सूत्रसंचालन, अजित कणसे यांनी प्रास्ताविक तर चंद्रकांत वीर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ पाटील, महेश निकत, पोपट पाटील, सुनील पवार, विकास माळी, सुधीर माने, प्रवीण शिंदे, अशोक कणसे, दत्तात्रय जाधव, नाना वारे, रघुनाथ फरतडे, भरत शिंदे, शिवलाल शिंदे, शहाजी रंदवे, नवनाथ मस्कर, विजय बाबर, दादासाहेब माळी, संतोष माने, अंकुश सुरवसे, शरद पायघन, शरद झिंजाडे, उमराव वीर, लहू चव्हाण, संपत नलवडे, वैशाली शेटे, सुनीता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक
वैशाली बागल, हिराबाई दळवी (अंगणवाडी क्र २४, मांगी), महादेव शिंदे (खडकी), अतुल घोगरे (पांगरे), सतिश शहापुरे (करंजे), शहाबुद्दीन मुलाणी (कुंभेज), पंकज गोडगे (सावडी), कीर्ती भापकर (वरकटणे), वर्षा आगळे (कुंभारगाव), सुजाता अनारसे (वीट), वनिता इंगोले (केतुर-१), दयानंद चौधरी (न. पा. मुली-१), सुग्रीव नीळ (हिवरे), दादासाहेब बरडे (छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट), प्रा. शिवाजी वाघमोडे (भारत महाविद्यालय, जेऊर)
उपक्रमशील शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुंजहिरावस्ती (वांगी)
राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
गणेशभाऊ करे-पाटील

Comments