मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा स्त्रियांनाही हळदी कुंकुवाचा मान .


  नर पूजा - हिच नारायण पूजा या संत वचनानुसार संत निरंकारी सत्संगच्या माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला . समाजातील अनिष्ठ रुढी परंपरे नुसार विधवा स्त्रियांना या सणातून वगळले जाते . परंतु संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक दृष्टीने ' नर हो चाहे नारी हो . कुदरत की रचना सारी हो । सर्व नारींचा यथायोग्य सन्मान व्हावा म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी वंचित राहत असलेल्या विधवांचाही हळदी कुंकूवाचे वाण देवून तसेच अंधारातून प्रकाशाकडे हे पुस्तक वाण म्हणून भेट देण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ ब्रँच करमाळाच्या वतीने - सौ प्रफुल्लता सातपुते- थोरात, सौ . संगीता नाईक सौ विजया थोरात यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी