करमाळा शहरातील टाऊन हाल ला उतरती कळा...


 करमाळा शहरातील ऐतिहासिक टाऊन हॉल धूळ खात पडून !


करमाळाः
प्रतिनिधी , 6 नोव्हेंबर 2022 : करमाळा शहरातील जयप्रकाश नारायण टाऊन हाँल हा एकेकाळी शहराचा मानबिंदू होता. याचे बांधकाम सुमारे 50 वर्षापूर्वी करमाळा नगर परिषदेने केले होते. यामध्ये लाखाच्या ही पुढे लग्न सोहळे , विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. कित्येकांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात येथून झाली आहे तर कित्येक लोकांच्या स्मृती या हाँल शी जुळलेल्या आहेत.

याठिकाणी कित्येक राजकीय पक्षाचे जिल्हा प्रमुख  राज्य प्रमुख एवढेंच नव्हे तर केंद्रीय मंत्री सुद्धा येऊन गेले आहेत. असा हा जयप्रकाश नारायण टाऊन हाँल पडझडी मुळे धूळ खात दुर्लक्षीत आहे.

त्याने जर स्वतः चे आत्मकथन केले तर करमाळा शहर वासियांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहिल्या शिवाय राहणार नाही.

या टाऊन हॉल संदर्भातील करमाळाकरांच्या मनातले दुःख कधी कमी होईल याची खात्री कोण देईल काय ?

किसन कांबळे
9970381507

Comments

Popular posts from this blog

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी