मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा "कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा" मोहोळ येथे संपन्न



रविवार दि. 22/1/2023 रोजी *महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा सोलापूर* तर्फे *"कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा"* आयोजित करण्यात आला होता. महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय *शामराव जवंजाळ सर* यांनी भूषवले. हा मेळावा जिल्हाध्यक्ष *कमलाकर बनसोडे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच जिल्हा सरचिटणीस *किरण सगेल*, पुणे विभागीय अध्यक्ष तथा जोशाबा पतसंस्थेचे चेअरमन *बाळासाहेब कारंडे,* जोशाबा पतसंस्थेचे संचालक *महेश्वर कांबळे*, पुणे जिल्हाध्यक्ष *वसंत गोसावी*, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष *सुदर्शन वराडे,* सोलापूर मनपा विभाग शहराध्यक्ष *नागेश गोसावी*, मनपा शिक्षक सोसायटी चेअरमन *इमरान सौराज*, जोशाबा पतसंस्थेचे संचालक *सखाराम राऊत*, कोअर कमिटी सदस्य *सिकंदर शेख,* माध्यमिक जिल्हा सचिव *जयकर ठोंबरे*, मनपा सचिव *अमोल भोसले*, *इमरान जमादार* कार्याध्यक्ष मनपा,  जिल्हा सल्लागार *रजाक शेख*, जिल्हा मार्गदर्शक *अर्जुन हिरशेट्टी* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा प्रसंगी *संघटनेचा  इतिहास , संघटनेची ध्येयधोरणे तसेच संघटना वाढीसाठी भविष्यातील नियोजन* यावर सखोल चर्चा करण्यात आली. अध्यक्ष स्थानावरून भाषण करताना राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी सांगितले की, *मागासवर्गीय शिक्षक संघटना शिक्षकांचे कठीण प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.* मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे यांनी 

*जुनी पेन्शन : इतिहास व भविष्य , तसेच संघटनेचे भविष्यातील नियोजन* यावर सखोल असे मार्गदर्शन केले.

             या मेळाव्यात राज्याध्यक्ष सन्माननीय शामराव जवंजाळ सर यांचा वाढदिवस ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 सदर कार्यकर्ता व प्रशिक्षण मेळाव्यात तालुका व जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली. यामध्ये 

       *(प्राथमिक विभाग)*


*तालुका*                  *अध्यक्ष*


सांगोला.               विवेकानंद ऐवळे

करमाळा.              किसन कांबळे

अक्कलकोट          परमेश्वर किणगे

उत्तर सोलापूर.       गुंडीबा हरगुडे

दक्षिण सोलापूर      अंबादास खराडे

मोहोळ.                 रोहिदास कांबळे

बार्शी.                    धनाजी खंडागळे


जि. उपाध्यक्ष       विजयकुमार थोरात

                           (अक्कलकोट)

जि. उपाध्यक्ष.        उत्तम ओहोळ. 

                             (माढा) 

ता. उपाध्यक्ष.        संतोष गोब्बुर. 

                          (अक्कलकोट) 

 ता. कार्याध्यक्ष.   खाजाप्पा बनसोडे

                         ( दक्षिण सोलापूर)


(कन्नड विभाग)*


कन्नड विभाग जिल्हाप्रमुख : *प्रभाकर मठ* (अक्कलकोट)


            (माध्यमिक)

*तालुका*                  *अध्यक्ष*

करमाळा.          संजय कुमार घोरपडे

 *(म. न. पा. विभाग, सोलापूर)*

     अध्यक्ष  : नागेश गोसावी 

       सचिव :  अमोल भोसले

वरील प्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस किरण सगेल यांनी केले. तसेच विविध तालुक्यांचे तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कारंडे ,अक्कलकोट तालुका अध्यक्ष परमेश्वर किनगे , सांगोला तालुका अध्यक्ष विवेक ऐवळे, करमाळा तालुका अध्यक्ष किसन कांबळे , दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अंबादास खराडे , माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुदर्शन वराडे , मनपा अध्यक्ष नागेश गोसावी , मनपा सचिव अमोल भोसले , उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष गुंडीबा हरगुडे , दक्षिण तालुका नूतन कार्याध्यक्ष खाजाप्पा बनसोडे, जिल्हा सल्लागार रजाक शेख ,  करमाळा तालुक्यातील संघटनेचे फाउंडर मेंबर संजय कांबळे,  माध्यमिक जिल्हा सरचिटणीस जयकर ठोंबरे , कपीनंदन कांबळे  बार्शी तालुकाध्यक्ष धनाजी खंडागळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

          सदर प्रसंगी  सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस किरण सगेल यांनी केले. मेळाव्याप्रसंगी तालुका, जिल्हा (प्राथमिक व माध्यमिक) तसेच मनपा विभागातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी