मागासवर्गीय शिक्षक संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करणार - संदिप कोहीनकर नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधीकारी मा .संदीप कोहिनकर यांचा राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ व जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ पुढे बोलताना म्हणाले की सर्व मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्याचं काम मागासवर्गीय शिक्षक संघटना करीत आहे याचा लाभ अनेक शिक्षकांनी आतापर्यंत घेतला आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास आपण सदैव दक्ष आहोत याबद्दल कोणीही मनात शंका ठेऊ नये असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी संघटनेचे प्रश्न सोडीविण्यास सहकार्य करू असे कोहीनकर यांनी चर्चेतून शब्द दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले .
यावेळी सोलापूर जिल्हा सचिव किरण सगेल, दक्षिण तालुका अध्यक्ष अंबादास खराडे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गुंडिबा हरगुडे, कोअर कमिटी सिकंदर शेख ,मनपा मुनाळे सर, इम्रान सर, प्रभाकर मठ, खाजाप्पा बनसोडे, जिल्हा सल्लागार रजाक शेख, हिरशेट्टी सर उपस्थित होते.

Comments