जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा जि.प.प्रा.केंद्र शाळा मोडनिंब येथे सोमवार दि. 17 / 1 /2023 रोजी पार पडल्या

करमाळा तालुका येथे प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिचा मोठ्या गटात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम झाला आहे .


तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली होती.मोठ्या गटात पूर्ण जिल्ह्यातून एकूण 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटातून करमाळा तालुक्यातील पोथरे शाळेची इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त समृद्धीचा माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.बंडू शिंदे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं.निशिगंधा माळी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.



तिच्या मार्गदर्शक शिक्षिका सौं.शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

समृद्धीच्या या उत्तुंग यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी श्री.जयवंत नलवडे साहेब , पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.निशांत खारगे साहेब,

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बप्पासाहेब शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सन्माननीय सदस्य आणि शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.गजेंद्र गुरव सर यांनी समृद्धी आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा^ ब्रँड अँबेसिडर ^म्हणून महेश वैद्य यांची निवड...

भविष्यात आरोग्यदायी सवयी आणी व्यायामासाठी आवर्जून वेळ कढावाच लागेल - महेश वैद्य

करमाळा शहरातील टाऊन हाल ला उतरती कळा...