Posts

Showing posts from January, 2023

प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Image
प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.*  खडके ( एरंडोल ) : कै. यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला मुलींचे बालगृहात आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि कल्पना हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमातून संस्था अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसाठी आणि मुलींसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले यावेळी बालगृहातील सर्व दाखल मुला मुलींचे डोळे तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आला तसेच संस्थेतील बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या प्रथमोपचारा साठी गोळ्या औषधींचे किट देखील देण्यात आले याप्रसंगी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील ;श्री राहुल पाटील ;श्री बाळा राजपूत तसेच कल्पना हॉस्पिटलचे नंदू पाटील; गौरव पाटील उपस्थित होते.

पुणे विभाग स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत कोंढार चिंचोली येथील प्रदीप भुई याने १७ वर्षे वयोगटात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले

Image
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे विभाग स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत कोंढार चिंचोली येथील प्रदीप भुई याने १७ वर्षे वयोगटात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले …. कोंढार चिंचोली गावचा सुपुत्र आणि सध्या त्रिमूर्ती विद्यालय टाकळी या ठिकाणी अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रदीप भुई याने पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या पुणे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ८०० मीटर आणि १५०० मीटर धावण्यामध्ये धडाकेबाज कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवले. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रदीपची निवड झाली आहे. विशेष म्हणजे पुणे विभागामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर, अहमदनगर ग्रामीण , सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या प्रत्येक ठिकाणी क्रमांक पटकावलेल्या पहिल्या दोन खेळाडूंमधून अव्वल ठरत प्रदीपने सर्वांनाच आपली गुणवत्ता दाखवून दिली… प्रदीप भुई हा जिल्हा परिषद ...

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा "कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा" मोहोळ येथे संपन्न

Image
रविवार दि. 22/1/2023 रोजी *महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा सोलापूर* तर्फे *"कार्यकर्ता प्रशिक्षण व जिल्हा मेळावा"* आयोजित करण्यात आला होता. महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय *शामराव जवंजाळ सर* यांनी भूषवले. हा मेळावा जिल्हाध्यक्ष *कमलाकर बनसोडे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच जिल्हा सरचिटणीस *किरण सगेल*, पुणे विभागीय अध्यक्ष तथा जोशाबा पतसंस्थेचे चेअरमन *बाळासाहेब कारंडे,* जोशाबा पतसंस्थेचे संचालक *महेश्वर कांबळे*, पुणे जिल्हाध्यक्ष *वसंत गोसावी*, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष *सुदर्शन वराडे,* सोलापूर मनपा विभाग शहराध्यक्ष *नागेश गोसावी*, मनपा शिक्षक सोसायटी चेअरमन *इमरान सौराज*, जोशाबा पतसंस्थेचे संचालक *सखाराम राऊत*, कोअर कमिटी सदस्य *सिकंदर शेख,* माध्यमिक जिल्हा सचिव *जयकर ठोंबरे*, मनपा सचिव *अमोल भोसले*, *इमरान जमादार* कार्याध्यक्ष मनपा,  जिल्हा सल्लागार *रजाक शेख*, जिल्हा मार्गदर्शक *अर्जुन हिरशेट्टी* यांच्या प्रमुख उपस्थितीत...
Image
 जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा जि.प.प्रा.केंद्र शाळा मोडनिंब येथे सोमवार दि. 17 / 1 /2023 रोजी पार पडल्या करमाळा तालुका येथे प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिचा मोठ्या गटात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम झाला आहे . तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली होती.मोठ्या गटात पूर्ण जिल्ह्यातून एकूण 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटातून करमाळा तालुक्यातील पोथरे शाळेची इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त समृद्धीचा माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.बंडू शिंदे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं.निशिगंधा माळी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या मार्गदर्शक शिक्षिका सौं.शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. समृद्धीच्या या उत्तुंग यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, विस्ताराधिकारी श्री.जयवंत नलवडे साह...

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक च्या शाखेचे करमाळ्यात उदघाटन

Image
  करमाळा प्रतिनिधी हिंदू संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून समाजाला दिशा देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले असून देव देश धर्म संस्कृतीची जतन करणाऱ्या ब्राह्मण समाजाचे योगदान नक्कीच प्रेरणादायी असून या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा यांच्या कार्यालयाचे उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुका अध्यक्ष उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य निश्चित आदर्शवत असुन सर्व जातीय लोकांशी असलेले प्रेम जिव्हाळा चे संबंध याचा ऊपयोग ब्राम्हण समाजाच्या विकासासाठी नक्कीच कामाला येणार आहे करमाळा तालुक्यात ब्राह्मण समाजाचे कार्य नक्कीच महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणार आहे.या कार्यक्रमास कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी (राजुरी) उपाध्यक्ष श्री रवींद्र विद्वत (वरकुटे) सचिव.बाळासाहेब होसींग. कार्यवाह श्री.निलेश गंधे.(देवाचा माळ) श्री. शंकर कुलकर्णी (कार्याध्यक्ष) करमाळा श्री...

मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा स्त्रियांनाही हळदी कुंकुवाचा मान .

Image
  नर पूजा - हिच नारायण पूजा या संत वचनानुसार संत निरंकारी सत्संगच्या माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला . समाजातील अनिष्ठ रुढी परंपरे नुसार विधवा स्त्रियांना या सणातून वगळले जाते . परंतु संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक दृष्टीने ' नर हो चाहे नारी हो . कुदरत की रचना सारी हो । सर्व नारींचा यथायोग्य सन्मान व्हावा म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी वंचित राहत असलेल्या विधवांचाही हळदी कुंकूवाचे वाण देवून तसेच अंधारातून प्रकाशाकडे हे पुस्तक वाण म्हणून भेट देण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ ब्रँच करमाळाच्या वतीने - सौ प्रफुल्लता सातपुते- थोरात, सौ . संगीता नाईक सौ विजया थोरात यांनी केले .

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे शाळेची तालुका स्तरीय स्पर्धेत यशस्वी बाजी

Image
आज तालुकास्तरीय लोकनृत्य, कथाकथन, वक्तृत्व व निबंध या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला करमाळा आणि न.पा. प्रा . शाळा क्र . 3 येथे पं. स . करमाळा यांच्या वतीने घेण्यात आल्या . या स्पर्धेत लोकनृत्य स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी १७ संघ तर वक्तृत्व, कथाकथन, निबंध या स्पर्धेत केंद्रस्तरावरील विजयी प्रत्येकी ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला . यामधे पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्यात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला व पोथरे शाळेचे नाव तालुक्यात गाजवले. यामध्ये प्रामुख्याने पुढील यश मिळवले आहे. कथाकथन स्पर्धा – तालुक्यात प्रथम क्रमांक – समृद्धी राजेंद्र झिंजाडे निबंध स्पर्धा तालुक्यात व्दितीय क्रमांक – शिवानी राजेंद्र झिंजाडे वक्तृत्व स्पर्धा तालुक्यात तृतीय क्रमांक – शिवानी राजेंद्र झिंजाडे लोकनृत्य स्पर्धा तालुक्यात तृतीय क्रमांक सहभागी विद्यार्थी – १. ऐश्वर्या बापू जाधव २. अनुजा तात्यासाहेब शिंदे ३. लखन मारुती लाढाणे ४. किरण कृष्णा जाधव ५. गौरव प्रकाश शिंदे ६. समृद्धी राजेंद्र झिंजाडे ७. शिवानी राजेंद्र झिंजाडे कु.समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी...

मागासवर्गीय शिक्षक संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करणार - संदिप कोहीनकर नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Image
  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक   संघटनेकडून नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधीकारी   मा .संदीप कोहिनकर  यांचा   राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ   व   जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे   यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ पुढे बोलताना म्हणाले की सर्व मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्याचं काम मागासवर्गीय शिक्षक संघटना करीत आहे याचा लाभ अनेक शिक्षकांनी आतापर्यंत घेतला आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास आपण सदैव दक्ष आहोत याबद्दल कोणीही मनात शंका ठेऊ नये असेही ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी संघटनेचे प्रश्न सोडीविण्यास सहकार्य करू असे कोहीनकर यांनी चर्चेतून शब्द दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले . यावेळी सोलापूर जिल्हा सचिव  किरण सगेल , दक्षिण तालुका अध्यक्ष  अंबादास खराडे , उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष  गुंडिबा हरगुडे , कोअर कमिटी  सिकंदर शेख  ,मनपा  मुनाळे सर, इम्रान सर,   प्रभाकर   मठ ,  ख...
Image
 डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न करमाळा : महापुरुषांचे शैक्षणिक कार्य हे खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले. तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मिलिंद फंड, बाळासाहेब गोरे, प्रताप काळे, सुरेश शिंदे, अतुल वारे, अमित घोगरे, सचिन काळे, नवनाथ ससाणे, अरुण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.                    यावेळी गणेश करे-पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस...
Image
    अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महेश वैद्य यांचा शारीरिक शिक्षणाच्या योगदानाबद्दल जाहीर सत्कार December 29, 2022   अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन. करमाळा:अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या (नाशिक)२०२१ -२०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन या निमित्ताने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कालावधीत पाच दिवसांच्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंस स्वामी, शंकराचार्य सच्चिदानंद स्वामी, अभिनेते डॉ.गिरीश ओक.भाजपचे माजी खासदार, किरीट सोमय्या, सुप्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवा उपस्थित होते.नाशिकच्या अभ्यंकर सभागृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीष ओक आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ५० समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.करमाळा अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष रविंद्र विद्वत,...

जेऊर चे जिनियस अबॅकस सेंटर पुण्यात ठरले यशाचे मानकरी...

Image
जेऊर येथील जिनियस अबॅकस सेंटर ची पुण्यात घवघवीत यश महाराष्ट्र  राज्यातील 7 जिल्ह्य़ातून पुणे येथे 29/12/2022 रोजी झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत 8750 विद्यार्थी मधुन कु.ईश्वरी सोमनाथ काशिद इयत्ता 3 री.ही लेवल 1च्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून विनर झाली.तसेच लिटिल चॅम्प लेवल मधे असरलान जावेद फकीर इयत्ता-2री हा 5 व्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे तसेच लेव्हल 1 च्या परीक्षेत अंजनडोह येथील श्रीराम केतन पाटील इयत्ता-4 थी चौथ्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे.8450 विद्यार्थी मधुन वरील 3 विद्यार्थ्यांची  पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षेत साठी निवड झाली आहे. ईश्वरी ,श्रीराम आरसलानचे खूप खूप अभिनंदन. तसेच 22 विद्यार्थी गोल्ड मेल्डलिस्ट मिळवुन यशस्वी झाले आहेत. लिटिल चॅम्प लेवल मधे दर्श रंदवे, उमेरा फकीर, सिद्धी गुळवे,गौरी शिंदे , तनिष्क सुर वसे, रणवीर पाटील, शाश्वत सुतार हे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले.लेवल 1 च्या परीक्षेत पार्थ वाघमोडे , शौर्यतेज रोकडे, सुयश चव्हाण, श्रुति गुंडगिरे , अनन्या मंजरतकर,शिवतेज मंजरतकर, यांना ही गोल्ड मेडल्स भेटले तसेच लेवल 2 च्या परीक्षेत ईशान फकीर, आ...